आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-दक्षिण आफ्रिकेत दुसरी कसोटी आजपासून; टॉस ठरणार निर्णायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बन - अटीतटीचा खेळ झाल्यानंतर पहिल्या कसोटीत ड्रॉवर समाधान मानणारे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून होत आहे. ही कसोटी जिंकून मालिका विजयासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न असतील. या सामन्यात फिरकीपटू अश्विनच्या जागी प्रज्ञान ओझाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
पहिली कसोटी अत्यंत रोमांचक झाल्यामुळे आफ्रिका पाहुण्या टीम इंडियाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. पहिल्या कसोटीचा रोमांच अखेरच्या षटकापर्यंत कायम होता. आता किंग्जमिडच्या मैदानावर दोन्ही संघांतील दुसरी कसोटी प्रेक्षणीय ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने 2-0 ने विजय मिळवला होता. आता दुसर्‍या कसोटीत जबरदस्त प्रदर्शन करून विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. या विजयाने वनडेतील पराभवाची परतफेड करण्यासाठी धोनी ब्रिगेड आतुर आहे. डर्बनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक अनुकूल असण्याची दाट शक्यता आहे.

पुढील स्लाइडमध्ये, कसे असतील दोन्ही संभाव्य संघ