आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेचा १४८ धावांनी विजय, आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी ठोकली शतके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - हाशिम आमला, रोवसवू आणि ए. बी. डिव्हिलर्सच्या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजवर १४८ धावांनी दुस-या वनडे सामन्यात दणदणीत विजय मिळवला. डिव्हिलर्सने ३१ चेंडूंत विक्रमी शतक ठोकत सामना गाजवला. द. आफ्रिकेच्या अव्वल ३ फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करत विंडीजची गोलंदाजी फोडून काढली.
प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने ५० षटकांत २ बाद ४३९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज निर्धारित षटकांत ७ बाद २९१ धावा करू शकला. यात सलामीवीर स्मिथने अर्धशतक झळकावले. त्याने ६५ चेंडूत ६४ धावा काढल्या. क्रिस गेल (१९) आणि एल. जॉन्सन (१) स्वस्तात बाद झाले. मॅर्लेन सॅम्युअल्सने ४० धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर आलेल्या दिनेश रामदीनने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्याने ५५ चेंडूत ५७ धावा काढून मॅर्केलचा शिकार झाला.
तिहेरी शतकी धमाका : दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीचे हाशिम आमला, रोवसवू आणि ए. बी. डिव्हिलर्सच्या जबरदस्त फलंदाजी करत शतके ठोकली. आमलाने १४२ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद १५३ धावा कुटल्या. रोसेयूने ११५ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकार खेचत १२८ धावा काढल्या. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची फिसे काढणा-या डिव्हिलर्सने अवघ्या ४४ चेंडूंचा सामना करताना १४९ धावा ठोकल्या.