आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • South African Bowller Dell Stain Very Soon Coming Hollywood

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन लवकरच झळकणार हॉलीवूडच्या चित्रपटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ‘स्टेन’गन ऊर्फ डेल स्टेन लवकरच हॉलीवूडच्या एका चित्रपटात झळकणार आहे. स्टेन दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळेच तो श्रीलंकेविरुद्ध मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता.


क्रिकेटपासून दूर असताना स्टेन आता हॉलीवूडमध्ये पाय ठेवणार आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या आगामी चित्रपटासाठी त्याला करारबद्ध करण्यात आले आहे. स्टेन आगामी चित्रपट ‘फॅमिली मून’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटासाठी स्टेनचे चित्रीकरणही झाल्याचे वृत्त आहे. या चित्रपटात आफ्रिकेचा क्रिकेटपटू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात हॉलीवूडचा स्टार अभिनेता अ‍ॅडम सँडलर आणि ड्रियू बॅरिमोर मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटात स्टेन सँडलरच्या मुलाला क्रिकेटचे धडे देताना दिसेल.


हे खेळाडूही चमकले होते चित्रपटात
सुनील गावसकर - माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ‘सावली प्रेमाची’ या मराठी चित्रपटात अभिनय केला होता. हिंदी चित्रपट ‘मालामाल’मध्येसुद्धा सनी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते.
कपिल देव - भारताला वनडे वर्ल्डकप जिंकून देणारे पहिले कर्णधार कपिल देवसुद्धा चित्रपटात चमकले होते. ते बॉलीवूडपट इक्बाल व मुझसे शादी करोगी, स्टम्पडमध्ये रुपेरी पडद्यावर आले होते.
संदीप पाटील - 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य असलेले आणि सध्याच्या निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील ‘कभी अजनबी थे’ चित्रपटात दिसले होते.
अजय जडेजा - टीम इंडियाचा फलंदाज अजय जडेजासुद्धा हिंदी चित्रपटात चमकला आहे. चंदेरी दुनियेत जडेजा फ्लॉप झाला. ‘खेल’ या चित्रपटात सुनील शेट्टीसोबत जडेजाने नायकाची भूमिका केली होती.
सलिल अंकोला - भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज सलिल अंकोलाने तीन चित्रपटांत काम केले. कुरुक्षेत्र, पिता आणि चुरा लिया है तुमने या तीन चित्रपटांत तो चमकला.
विनोद कांबळी - सचिन तेंडुलकरचा बालमित्र आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीनेसुद्धा चंदेरी दुनियेत नशीब आजमावले आहे. विनोदने ‘अनर्थ’ चित्रपटात पदार्पण केले होते.