आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South African Jacques Kallis Reitres From All Formats Of Cricket Latest News In Marathi

जॅक कॅलिसची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, IPL मध्ये खेळण्याचे दिले संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याशिवाय त्याने आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा विचारही सोडून दिला. आफ्रिका संघाच्या या 38 वर्षीय कॅलिसने गतवर्षीच कसोटीतील निवृत्ती जाहीर केली होती. कॅलिसने 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार्‍या विश्वचषकात खेळण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतरच त्याने हा निर्णय घेतला.