आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियाकडून डेव्हिस चषकात भारत पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दक्षिण कोरियाने डेव्हिस चषक ओसनिया ग्रुप एकमध्ये भारताचा 4-1 ने पराभव केला. भारत आता पाच एप्रिलपासून इंडोनेशियासोबत पहिल्या फेरीतील प्ले ऑ फ सामने खेळणार आहे. यातील विजयामुळे भारताचे ग्रुपमधील स्थान कायम राहील. मात्र, पराभव झाल्यास भारताला दुस-या फेरीचे प्ले ऑफ खेळवा लागेल.

भारत शनिवारी डबल्सचा सामना जिंकल्यानंतर 1-2 ने पिछाडीवर होता. यामुळे, भारताला रविवारी दोन रिवर्स एकेरीचे सामने जिंकणे आवश्यक होते. मात्र, यजमानांच्या आशा धुळीत मिळाल्या. रंजित व सुक योंग जियोंग यांच्यात झाला. कोरियाच्या जियोंगने रंजितवर 6-4, 6-4, 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला.दुसरीकडे विजयंत मलिकलाही एकेरीच्या लढतीत विजय मिळवता आला नाही. जी सुंग नामने मलिकला 6-2, 6-4 ने पराभूत केले.