आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Southampton Test: England Seek Self Respect Against India

भारतVs इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरू, नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी
साउदम्पटन- लॉर्ड्स टेस्टमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने नाणे फेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर लॉडर्सवरील विजयानंतर भारत हा सामनाही जिंकण्यासाठी प्रयत्नात असेल. पहिला कसोटी सामना अनिर्णयीत राहिल्यावर दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर 95 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच या सीरिजमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आजच्याही सामन्यामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी धोनी ब्रिगेड कोणती रणनिती घेऊन मैदानात उतरेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या सामन्यात बिन्नीच्या जागी रोहित शर्माला घेण्यात आले आहे. बिन्नीने मागील दोन कसोटी सामन्यात 20 षटके टाकण्यास मिळाली. तर पहिल्या कसोटीसामन्यात बिन्नीने टीम इंडियासाठी चांगला प्रदर्शन केले होते.
इशांत आणि बिन्नी टीम इंडियातून बाहेर
आजच्या या तिसर्‍या कसोटी सामन्यात इशांत शर्माच्या जागी पंकज सिंह याला संधी देण्यात आली आहे, तर बिन्नीऐवजी रोहित शर्माला संघात स्थान दिले आहे. बिन्नीने मागील दोन कसोटी सामन्यात 20 षटके टाकण्यास मिळाली. तर पहिल्या कसोटीसामन्यात बिन्नीने टीम इंडियासाठी चांगला प्रदर्शन केले होते.
धवन - कोहलीच्या जोडीमुळे वाढू शकतात अडचणी
सामन्याच्या सुरूवातीच्या दोन दिवसांमध्ये शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीचा जोमाने सराव केला. या सामन्यांमध्ये धवन आणि कोहली आत्तापर्यंत कोणतीही आकर्षक कामगिरी करू शकले नाही, त्यामुळे त्यांना सरावासाठी जास्त वेळ देण्यात आला आहे. टीम इंडियाने सात फलंदाजांसमवेत चार गोलंदाजांची हे समिकरण ठेवल्यास त्यांना उतरवण्यात येऊ शकते.
इंग्लंडसाठी महत्त्वाचा सामना
आपल्याच भूमीवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडटीमवर जनतेकडून चांगलीच टीका होत आहे. कर्णधार एलेस्टेयर कुक यांच्या खराब खेळामुळे सर्वांना निराशा होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कुक केवळ पाच धावा काढून बाद झाले होते. तर, लॉडर्स कसोटी सामन्यात त्यांनी 10 आणि 22 अशा एकूण 32 धावा काढल्या होत्या. त्यामुळे आज कुक यांनी चांगली कामगिरी करणे हे इंग्लंडसाठी अत्यावशक आहे, तर कुकच्या खराब कामगिरीचा भारताला चांगलाच फायदा होऊ शकतो.
पुढील स्लाईडवर पाहाः साऊथम्पटन कसोटी सामन्याच्या सुरूवातीला सराव करताना खेळाडू...