आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spain Beat Italy On Penalties To Face Brazil In Confederations Cup Final

नेवासचा निर्णायक गोल; इटलीला धूळ चारत स्पेन अंतिम फेरीत ब्राझीलशी भिडणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्टलेझा - विश्वविजेता व युरो चॅम्पियन स्पेन संघाने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या संघाने उपांत्य लढतीत इटलीचा पराभव केला. स्पेनने पेनॉल्टी शूटआऊटमध्ये 7-6 ने सामना जिंकला. जिसस नेवासने निर्णायक गोल करून संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.

इटलीच्या दमदार खेळीमुळे निर्धारित वेळेपर्यंत स्पेनला गोलचे खाते उघडता आले नाही. हा सामना 0-0 गोलने बरोबरीत खेळवला गेला. त्यानंतरही ही लढत शून्य गोलने बरोबरीत राहिली. अखेर स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारली. कांड्रेव्हाने इटलीकडून पहिला गोल केला. झावीने स्पेनला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. अँक्युलिनीच्या गोलमुळे स्पेनने 2-1 ने आघाडी घेतली. मात्र, इनेस्ताच्या गोलवर इटलीने 2-2 ने बरोबरी साधली.रोस्सीने केलेल्या गोलच्या जोरावर इटलीने 3-2 ने आघाडी घेतली. पिक्युईच्या गोलमुळे स्पेनने 3-3 ने बरोबरी साधली. गोविन्कोच्या गोलमुळे इटलीला 4-3 ने आघाडी घेता आली. त्यानंतर स्पेनसाठी रामोस, हुगेने, बोनस्सी व नेवासने गोल केले. इटलीसाठी पिलरे, मोटोलिव्होनेही गोल केले.

इटली-उरुग्वे लढत रविवारी
कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीत पराभूत झालेल्या इटलीला आता तिसर्‍या स्थानासाठी उरुग्वेच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. रविवारी तिसर्‍या स्थानासाठी हा सामना रंगणार आहे. ब्राझीलविरुद्ध उपांत्य लढतीत उरुग्वेला 1-2 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

छायाचित्र :कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या रंगतदार उपांत्य लढतीत हेडरने गोल करण्याच्या प्रयत्नात स्पेनचा सर्जियो रामोस व इटलीचा अल्बटरे गिरालिंडो.