आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेन्मार्कवर विजयासह स्पेन उपांत्य फेरीत; एका गुणावर लागला निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोहा - स्पेनने २४ व्या पुरुष वर्ल्ड हँडबॉल चॅम्पियनशिपच्या रोमांचक उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कला २५-२४ ने पराभूत करून सेमीफायनल प्रवेश केला. ३० जानेवारी रोजी सेमीफायनलमध्ये स्पेनचा सामना फ्रान्ससोबत होईल.
सामन्याच्या हाफटाइममध्ये दोन्ही संघ ११-११ ने बरोबरीत होते. विजेता संघासाठी सर्वाधिक १० गोल रिवेरा वलेरोने केले. डेन्मार्कने त्याच्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तो अपयशी ठरवत रिवेराने आपले काम केले. याशिपवाय कॅनिलासने ५, राऊलने ४ तर जोरगीने २ गोल केले. डेन्मार्ककडून आंद्रेस आिण हानमेन मिकेलले प्रत्येकी ६ गोल केले. लारसनने ४, तर लिंडबर्ग, क्रिस्ट्रयानसीनने प्रत्येकी २ गोल केले.