आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनच्या राफेल नदालचे पुनरागमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीना डेल मार (चिली) - जगातला माजी नंबर वन टेनिसपटू स्पेनच्या राफेल नदालने व्यावसायिक टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे. सात महिन्यांनंतर टेनिस सामना खेळताना नदालने चिली ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचा सामना जिंकला.

26 वर्षीय नदाल आणि अर्जेंटिनाचा त्याचा जोडीदार जुआन मोनाको यांनी फ्रेंटिसेक सेरमाक आणि लुकास डुलोही या दुस-या मानांकित चेक गणराज्यच्या जोडीला 65 मिनिटांत 6-3, 6-2 ने हरवले. नदाल आता एकेरीत अर्जेंटिनाचा क्वालिफायर फेडेरिको डैल्बोनिसविरुद्ध खेळेल. मागच्या जून महिन्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेत चेक गणराज्यच्या लुकास रोसोलविरुद्ध दुस-या फेरीचा सामना गमावल्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे टेनिस कोर्टपासून दूर गेला होता. मागच्या वर्षाच्या अखेरीस त्याने कोर्टवर पुनरागमन करण्याची त्याची योजना होती. मात्र, आजारी असल्यामुळे तो असे करू शकला नाही. नदाल आता या महिन्यात लॅटिन अमेरिकेत आपल्या आवडत्या क्ले कोर्टवर तीन स्पर्धा खेळेल.