आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रिइझमनचा धमाका; अ‍ॅथलेटिको माद्रिद विजयी, डी. गोडिनचे संघाच्या विजयात एका गोलचे योगदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिदला लीग चॅम्पियन अ‍ॅथलेटिको माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये शानदार विजयाची नोंद केली. या क्लबने सामन्यात लेवांटेचा पराभव केला. माद्रिदने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला. फ्रेंचचा स्टार मिडफील्डर अ‍ॅटिनो ग्रिइझमनने (१८, ४७ मि.) केलेल्या गोलच्या बळावर अ‍ॅथलेटिको माद्रिदने सामन्यात विजय मिळवला. डी. गोडीनने (८२ मि.) क्लबच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. लेवांटेसाठी एन. एल. झारने सामन्याच्या ६२ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. मात्र, त्याला क्लबचा पराभव टाळता आला नाही. या शानदार विजयासह माद्रिदने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर धडक मारली.
सामन्याच्या १८ व्या मिनिटाला अ‍ॅटिनो ग्रिइझमनने अ‍ॅथलेटिको माद्रिदला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्याने शानदार गोल करून सामन्यात आपला दबदबा निर्माण केला. या गोलच्या बळावर माद्रिदने मध्यंतरापूर्वी सामन्यात १-० ने आघाडी घेतली.

सेव्हिला विजयी
सेव्हिलाने लीगमध्ये रोमहर्षक विजय संपादन केला. या क्लबने सामन्यात सेल्टा डी विगोला १-० अशा फरकाने पराभूत केले. निको पारेजा (३२ मि.) याने केलेल्या गोलच्या बळावर सेव्हिलाने सामना जिंकला. दुसरीकडे मलगा एफसीला पराभवाचा सामना करावा लागला. या क्लबला युडी अल्मानियाने २-१ अशा फरकाने हरवले.