आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spanish Football League: Real Madrid Loss With Valencia

स्पॅनिश फुटबॉल लीग : रिअल माद्रिदचा पराभव, व्हॅलेन्सिया २-१ ने विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेन्सिया - क्रिस्टियानो रोनाल्‍डोच्या रिअल माद्रिदला सुमार कामगिरीमुळे स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. व्हॅलेन्सियाने सामन्यात रिअल माद्रिदवर २-१ अशा फरकाने मात केली. बारागन (५२ मि.) आणि ओटामेंडी (६५ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर व्हॅलेन्सियाने सामना जिंकला. दुसरीकडे सामन्याच्या १४ व्या मिनिटाला रोनाल्‍डोने माद्रिदसाठी केलेला गोल व्यर्थ ठरला. त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. या शानदार विजयासह व्हॅलेन्सियाने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर धडक मारली. आता या क्लबचे एकूण ३४ गुण झाले आहेत.

सामन्याच्या १४ व्या मिनिटाला रोनाल्‍डोने माद्रिदला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. मात्र, माद्रिदचा सामन्यातील हा एकमेव गोल ठरला. याच गोलच्या बळावर माद्रिदने मध्यंतरापूर्वी सामन्यावर पकड घेतली होती.

दुसऱ्या हाफमध्ये व्हॅलेन्सियाने सामन्यात पुनरागमन केले. लढतीच्या ५२ व्या मिनिटाला बारागानने व्हॅलेन्सियाकडून गोलचे खाते उघडले. त्याने संघाला १-१ ने बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ६५ व्या मिनिटाला ओटामेंडीने सामन्यात संघासाठी विजयी गोल केला. त्याने केलेल्या या गोलच्या बळावर व्हॅलेन्सियाने सामन्यातील आपला विजय निश्चित केला.