आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spanish Football League Real Madrid Win On Barcelona

रियल माद्रिदकडून पुन्हा बार्सिलोनाचा पराभव..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- क्रिस्टियानो रोनाल्डोच्या रियल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये बार्सिलोनावर 2-1 ने मात केली. रियल माद्रिदने अवघ्या पाच दिवसांत बार्सिलोनाला सलग दुसर्‍यांदा धूळ चारली. यापूर्वी कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीत माद्रिदने मेसीच्या बार्सिलोनावर विजय मिळवला होता.
गुणतालिकेत तिसर्‍या स्थानी असलेल्या रियल माद्रिदने बलाढ्य बार्सिलोनाविरुद्ध दमदार सुरुवात केली. घरच्या मैदानाचा फायदा घेत यजमानांनी सहाव्या मिनिटाला आघाडी मिळवली. लढतीत करीम बेंझेमाने बार्सिलोनाविरुद्ध पहिला गोल केला. मात्र, ही आघाडी माद्रिदला फार काळ राखून ठेवता आली नाही. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला सुपरस्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसीने बार्सिलोनाला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत ही लढत 1-1 ने बरोबरीत खेळवली गेली. दुसर्‍या हाफमध्ये माद्रिदला आघाडी घेण्यात यश मिळाले. रामोसने 82 व्या मिनिटाला गोल करून यजमानांचा विजय निश्चित केला. बार्सिलोनाचा लीगमधील हा दुसरा पराभव ठरला. सलग दोन सामन्यात रिअल माद्रिदकडून हरल्याने हा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.