Home »Sports »From The Field» Special Preparations In Ranchi For First International One Day Match

PHOTOS : टीम इंडियाची धोनीच्या घरी जोरदार पार्टी; इंग्लंडच्या खेळाडूंचा पास्ता, चिकनवर ताव

दिव्य मराठी वेब टीम | Jan 17, 2013, 18:50 PM IST

रांची- भारत आणि इंग्लंड यांच्यात होणा-या तिस-या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ रांचीत काल सायंकाळी दाखल झाले आहेत. आज सकाळपासून दोन्ही संघातील खेळाडू नेट प्रॅक्टिस करीत आहेत.
बुधवारी सायंकाळी दोन्ही संघ दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी मजा-मस्‍ती करीत विश्रांती करणे पसंत केले. रेडिसन ब्लू मधील तिस-या मजल्यावर उतरलेल्या इंग्लंड टीमचे बहुतेक खेळाडू आपल्या रूममध्ये ग्रिल्ड चिकन आणि पास्ता खाणे पसंत केले. कॅफेचिनो कॉफीही घेतली. याचबरोबर हॉटेलच्या लॉबीत वॉटर फ्रंट रेस्टॉरंटमध्ये शंभरएक लोकांच्या डिनरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, येथे इंग्लंड टीमचे दोन-तीन खेळाडूच पोहचले.
काय होते खाण्यात- बुफेमध्ये चार प्रकारचे नॉनव्हेज, सहा प्रकारचे व्हेजिटेबल, सात-आठ प्रकारच्या रोट्या, दोन चायनीज आयटम (नूडल्स आणि मंचूरियन), दोन प्रकारचे सूप, चार प्रकारच्या मिठाई आणि सालॅड ठेवण्यात आले आहेत.
कोणत्या खोलीत कोण- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 317 नंबरची रूम दिली आहे. इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकला 417 नंबरची रूम दिली गेली आहे. रूम नंबर 308 मध्ये युवराज, 316 मध्ये भुवनेश्वर कुमार, 402 मध्ये पीटरसन, 404 मध्ये मॉर्गन उतरले आहेत. मात्र, धोनी एअरपोर्टवरून सरळ गाठले व टीम इंडियाच्या खेळाडूंना शानदार पार्टी दिली. ही पार्टी चार तासांपेक्षा जास्त चालली. रात्र जास्त झाल्याने सुरेश रैना धोनीच्या घरीच थांबला.
दरम्यान, त्याआधी झारखंडची राजधानी रांचीत क्रिकेटरसिकांकडून टीम इंडियाचे जबरदस्‍त स्‍वागत करण्यात आले होते. तर, दुसरीकडे काही राजकीय कार्यकर्ता नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी तयार आहेत. मोदी जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमच्या उदघाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Next Article

Recommended