आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speech Of Former Cricketer Sachin Tendulkar About ICC Cricket World Cup 2015

आफ्रिकेविरुद्ध भारताच्या पदरी एकही विजय नाही; भारतापुढे स्टेनचेच खरे आव्हान : तेंडुलकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी धोक्याची सूचना टीम इंडियाला सचिन तेंडुलकरने दिली आहे. सचिन म्हणाला, "भारताला मजबूत सलामीची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक किंवा दोन धावा घेताना भारतीयांना सतर्क राहावे लागेल.
कारण त्यांच्याविरुद्ध सिंगल काढणेसुद्धा सोपे ठरणार नाही.' एका न्यूज चॅनलशी बोलताना सचिनने ही माहिती दिली. मास्टर ब्लास्टर म्हणाला, द. आफ्रिकेचे खेळाडू मजबूत स्थितीत आहेत.
पाकिस्तानच्या तुलनेत ते खूप चपळ आहेत. त्यांचे क्षेत्ररक्षण शानदार आहे. वेगवान गोलंदाज डेल स्टेन खूपच खतरनाक आहे. त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा दिसते. यात कसलीच शंका नाही की, भारतीय फलंदाजांसमोर स्टेनच्या गोलंदाजीचे मुख्य आव्हान असेल. रोहित शर्माकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची आशा आहे. याशिवाय कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडूनसुद्धा चांगल्या प्रदर्शनाची आशा असेल. मी रोहितवर दबाव निर्माण होण्याचे बोलत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, आपण पुन्हा एकदा विश्वचषक जिंकू शकतो. मात्र, यासाठी सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी करणे गरजेचे आहे. फक्त एका खेळाडूने हे शक्य नाही. अशा विजयासाठी संपूर्ण संघाच्या सहकार्याची गरज असते, असेही सचिनने नमूद केले.

भारतीय संघ उपांत्य फेरी गाठणार नाही : हसी
गतविजेता भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीपर्यंत पाेहोचू शकणार नाही, असा तर्क अाॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने काढला अाहे. यजमान अाॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह श्रीलंका अाणि दक्षिण अाफ्रिका संघ उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित करतील, असेही ताे म्हणाला. हसीच्या मते, मागील काही दिवसांपासून भारतीय संघ अपयशी ठरत अाहे. संघातील काही चांगले खेळाडू अागामी सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. भारतीय खेळाडू शाॅर्ट पिचवर खेळण्यासाठी सक्षम अाहेत, असे असले तरी भारताचा मार्ग कठीण आहे, असे तो म्हणाला.

विश्वचषकातील आपल्या सलामी सामन्यात पाकिस्तानला नमवणाऱ्या टीम इंडियाचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. त्यामुळे अाता भारतीय संघ स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण अाफ्रिकेला सहज धूळ चारेल, असा विश्वास भारताच्या माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने व्यक्त केला. मागील अडीच महिन्यांपासून भारतीय संघ अाॅस्ट्रेलिया दाैऱ्यावर अाहे. येथील वातावरणात संघ पूर्णपणे सहभागी झाला अाहे. अाता या वातावरणाचा टीम इंडियाला होईल, असेही ताे म्हणाला.