नवी दिल्ली- आयपीएलमध्ये एकेकाळी मैदान गाजवणार्या फिरकीपटू प्रग्यान ओझाकडे मुंबई इंडियन्सकडून कानाडोळा झाला असला तरी तो नव्या उमेदीने, नव्या संघाकडून पुनरागमन करणार आहे. मुंबईने डावलल्यामुळे आपण निराश झालो नाही. काही गोष्टी आपल्या हाती नसतात. लिलाव स्पर्धेत आपण कायम राहू. जो संघ निवडेल त्याकडून शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न राहील, असे त्याने सांगितले. व्यावसायिक खेळाडूने भावनाप्रधान राहून चालत नाही. हा एक खेळाचाच भाग असून तो स्वीकारला पाहिजे, असेही तो म्हणाला