आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फिरकीपटूंनी मला चुकीचे ठरवले\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची- फलंदाजीत खराब सुरूवातीनंतरही इंग्‍लंडवर मोठा विजय मिळवण्‍यात यश आल्‍यामुळे उत्‍साहित झालेल्‍या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजयाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला दिले. मात्र आपल्‍याला चुकीचे ठरवणा-या आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे मात्र त्‍याने विशेष कौतुक केले.

इंग्‍लंडवर 127 धावांनी विजय मिळवल्‍यानंतर त्‍याने टीममधील प्रत्‍येकाचे प्रदर्शन चांगले झाल्‍याचे म्‍हटले. आमची सुरूवात चांगली झाली नव्‍हती. सलामीवीरांना जम बसवता आला नाही. मात्र, युवराज आणि विराट कोहलीने आमच्‍यासाठी मंच तयार केला. इथे सपाट विकेट असल्‍यामुळे फिरकीपटूंना सहाय्य मिळणार नसल्‍याचे आम्‍हाला वाटत होते. पण बरं झालं, इथे मी चूकीचा ठरलो. आमच्‍या फिरकीपटूंना टर्न मिळाला, असे धोनीने म्‍हटले.

धोनी पुढे म्‍हणाला, एक वेळ आम्‍ही 250 धावांचे लक्ष्‍य ठेवले होते. जेव्‍हा मी आणि रैना खेळत होतो तेव्‍हा आम्‍ही 240 किंवा 250 पर्यंत पोहचण्‍याचा आमचा विचार होता. त्‍यानंतर जेव्‍हा आमचा जम बसला तेव्‍हा आम्‍ही 260 धावांचे लक्ष्‍य ठेवले. पण आम्‍ही 15 धावा अधिक केल्‍या.