आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CLT-20 मध्‍ये पाचवा गोलंदाज संशयाच्‍या भोव-यात, अॅक्‍शनचा बसणार फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगलुरु - कोलकाता नाइटराइडर्सचा गोलंदाज सूर्यकुमार यादवला देखील बॉलिंगमधील अॅक्शनचा फटका बसणार आहे. शनिवार झालेल्‍या चॅम्पियंस लीग टी-20 च्‍या अंतीम सामन्‍यामध्‍ये पंचानी त्‍याच्‍या अॅक्‍शन बद्दल तक्रार दाखल केली.
कोलकाता नाइटराइडर्सचा पार्टटाइम स्पिनर यादवचा वॉर्निंग लिस्ट मध्‍ये समावेश केला आहे. या लीगदरम्‍यान वॉर्निंग लिस्‍टमध्‍ये येणारा तो पाचवा गोलंदाज ठरला आहे. सुनील नारायण, डॉल्फिन्स संघाचा प्रेनेलन सुब्रायेन आणि लाहोर लॉयंसचा अदनान रसूल व मोहम्मद हफीज यांच्‍या बॉलिंग अक्शनला सदोष ठरवण्‍यात आहे.

फील्ड अंपायर रॉड टकर आणि कुमार धर्मसेना यांनी थर्ड अंपायर एस रविसोबत चर्चा करून, सामन्‍याचा व्हिडिओ पाहून सूर्यकुमारला वॉर्निंग दिली आहे. सूर्यकुमार बॉलिंगवेळी हाताचा कोपरा 15 डिग्रीपेक्षा जास्‍त वाकवत असल्‍याचे व्हिडिओमध्‍ये दिसते.
चॅम्पियंस लीग टी-20 च्‍या पॉलिसीनुसार यादव बीसीसीआयच्‍या अॅक्शन कमेटीकडे अपील करु शकतो.