आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spinners May Play Major Role In IPL: Sanjay Manjrekar News In Divya Marathi

यंदा लीगमध्ये फिरकीपटूंची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण : संजय मांजरेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होणार्‍या आयपीएलच्या पहिल्या पर्वात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे मत भारताचे माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

मी संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळलो असून येथील खेळपट्टय़ा फिरकीसाठी अनुकूल आहेत. परंतु संयुक्त अरब अमिरातमधील दुबई आणि अबुधाबीच्या खेळपट्टय़ांपेक्षा अबुधाबीची खेळपट्टी खूप भिन्न आहे. येथे उसळी घेणार्‍या चेंडूंना अधिक मदत मिळते, असेही मांजरेकर या वेळी म्हणाला. आयपीएल हा क्रिकेटचा भन्नाट असा प्रकार आहे. दक्षिण आफ्रिकेत जेव्हा आयपीएलच्या पर्वाचे आयोजन केले गेले होते तेव्हा ते प्रचंड गाजले होते. या वेळची आयपीएल स्पर्धा तर भारताच्या शेजारी देशातच आहे. त्यामुळे येथेसुद्धा अमाप प्रसिद्धी मिळेल यात काहीच शंका नसल्याचे त्याने या वेळी सांगितले. मांजरेकरच्या मते, अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधाराची भूमिका आणि संघासोबतचा स्टाफ हा मदतनिसाच्या भूमिकेत असतो. याचा निकाल मात्र अन्यच कारणांनी लागत असतो. त्यामध्ये प्रत्यक्ष खेळाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहत असते.

भारतीय खेळाडू अधिकच उत्सुक
तब्बल आठ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाचे स्टार हे अबुधाबीत खेळणार आहेत. एकेकाळी शारजामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिकेचे आयोजन केले जात होते. यंदा सातव्या सत्राच्या आयपीएलचे एकूण 20 सामने अबुधाबी, दुबई आणि शारजाच्या मैदानावर होणार आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यंदा ही स्पर्धा गाजवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल. या स्पर्धेचा सुरुवातीचा आठवडा हा अधिकच हाऊसफुल्ल राहील, असा विश्वासही आयोजकांनी वर्तवला. या स्पर्धेची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.