आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ऑक्टोबर 2013 ते मार्च 2014 या कालावधीतील भारतातील स्थानिक व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाचा ‘टीम इंडिया’ टायटल स्पॉन्सर आणि सामन्यांचा पुरस्कर्ता यासाठी बीसीसीआयने आज निविदा मागवण्याचा निर्णय घेतला. आज मुंबईत क्रिकेट सेंटरमध्ये झालेल्या अर्थ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यमान स्पॉन्सर्स एअरटेलने करार वाढवण्यात रस दाखवला नाही.
ऑक्टोबर (2013) ते मार्च (2014) या सहा महिन्यांच्या कालावधीत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारताबरोबर सात एकदिवसीय सामने होणार आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ भारतात दोन कसोटी व तीन एकदिवसीय सामने
खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय सामने पुरस्कृत करणा-या पुरस्कर्त्याला स्थानिक क्रिकेट सामन्यांच्या पुरस्कर्त्याचे हक्कही प्रदान करण्यात येतील. स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, विजय हजारे करंडक स्पर्धा, प्रा. दि. बा. देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा, राजसिंग डुंगरपूर करंडक क्रिकेट स्पर्धांचा समावेश असेल.
त्याशिवाय पाहुण्या ‘अ’ क्रिकेट संघाचे सामने, सराव सामने व ‘अ’ क्रिकेट संघाचे सर्व प्रकारचे क्रिकेट सामने यांचेही ‘टायटल स्पॉन्सरशिप’चे हक्क पुरस्कर्त्याला मिळतील. निविदा 20 सप्टेंबर रोजी 11 वाजेपासून उपलब्ध असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.