आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Authority Of India Aurangabad Visit Sports Minister

क्रीडामंत्र्यांची साईला भेट; नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याची पूर्वतयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) ऑगस्टमध्ये भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी हे साई येथील पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी शहरात येणार आहेत. त्यांनी 6 ऑगस्ट रोजी कार्यक्रम निश्चित केला असल्याची माहिती साईचे सहसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. मोदी यांचा दौरा औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रासाठी आणि साईसाठीदेखील अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौर्‍यामुळे साईत सुविधा वाढतील आणि अनेक दिवसांपासून असलेली सब सेंटरची मागणी पूर्ण होण्यास मदत होईल. या वेळी फिटनेस सेंटरचे उद्घाटनदेखील मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सध्या साईत इमारतींच्या रंगरंगोटीसह, वृक्षारोपण, स्वच्छतेची कामे सुरू असल्याचे भांडारकर म्हणाले.