आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Authority Of India News In Marathi, Divya Marathi

साईच्या माजी संचालकास सक्तीची सेवानिवृत्ती, ३० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) ने माजी संचालकास संस्थेच्या पैशातून मोबाइल आणि सोन्याची अंगठी विकत घेतल्याप्रकरणी सक्तीची सेवानिवृती दिली आहे. चंदिगड विभागाचे माजी संचालक व सध्या दिल्लीत कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ. पी. सी. कश्यप यांनी हा अपहार केला होता. साईच्या ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यावर अशी कारवाई करण्यात आली आहे. निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी २०१३ मध्ये कश्यप यांच्या चौकशीचे आदेश िदले होते. चौकशीच्या आधारे साईच्या महासंचालकांनी ९ सप्टेंबरला कश्यप यांच्यावर ही कारवाई केली.

काय होते प्रकरण ?
"दिव्य मराठी'कडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, २००० मध्ये चंदिगडच्या विभागीय संचालक पदावर कार्यरत असताना कश्यप यांनी २० हजार रुपयांची अ‍ॅडव्हान्स उचल केली होती. मात्र, साईच्या नियमानुसार त्यांना अशा प्रकारे उचल करता येत नाही. नंतर त्यांची या प्रकरणी चौकशी झाली असता त्यांनी नेमक्या कोणत्या हेतूने ही रक्कम घेतली होती यािवषयी काही स्पष्ट कारण देऊ शकले नाहीत.

मंत्र्यांच्या मुलाला सोन्याची अंगठी दिली
दैनिक "दिव्य मराठी'कडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, १६ एप्रिल २००० रोजी कश्यप यांनी साईच्या निधीतून ३५९४ रुपयांत एक सोन्याची अंगठी विकत घेतली. त्यांनी ती अंगठी तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या मुलाला लग्नात भेट दिली. नियमांनुसार अधिकारी प्रशासकीय अधिकाराचा वापर करून अशा वस्तू घेऊ शकत नाहीत.

साईच्याच पैशाने मोबाइलही घेतला
अहवालातील परिशिष्ट- २ अनुसार, कश्यप यांनी साईचे नियम डावलत निधीतून ९ हजार ५०० रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा मोबाइल विकत घेतला. अशा प्रकारची खरेदी करण्याचे त्यांना अधिकार तसेच परवानगीसुद्धा नाही. कश्यप यांनी याबाबत २० जानेवारी २०१४ रोजी खुलासा दिला.

३० वर्षांत प्रथमच अशी कारवाई
स्पोर्ट््स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थापनेपासूनच्या ३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अनिवार्य सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्यप यांना याप्रकरणी बडतर्फ करता आले असते. मात्र, यामुळे त्यांची पेन्शन अडकली असती. आता त्यांना सेवानिवृत्ती देऊन साईबाहेर करण्यात आले आहे.