आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Diganataries In Double Interest List, Gavaskar, Shastri, Gangly

द्विहितसंबंध असणा-यांच्या यादीत दिग्गजांची नावे; गावसकर, शास्त्री, गांगुलीचे नाव सामील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या विचारणेनंतर बीसीसीआयने सादर केलेल्या द्विहितसंबंधाला बाधा येणा-या व्यक्तींच्या यादीत माजी कसोटीपटू सुनील गावसकर, रवी शास्त्री, सौरव गांगुली यांचाही समावेश असल्यामुळे खळबळ उडाली आहे. न्यायालयाने बीसीसीआयला द्विहितसंबंध असणा-या क्रिकेटपटू, क्रिकेट प्रशासक आणि पदाधिकारी यांची नावे सादर करण्यास सांगितले होते. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये आर्थिक हितसंबंध असणा-या व्यक्तींची नावे आज बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली. द्विहितसंबंध प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
बीसीसीआयने सादर केलेल्या अशा व्यक्तींच्या यादीमध्ये क्रिकेटपटूंची नावे गोवल्याचे न्यायालयाला रुचले नाही. न्यायालयाने बीसीसीआयकडे विचारणा केली. के. श्रीकांत हे चेन्नई सुपरकिंग्जचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असताना राष्ट्रीय निवड समितीचे चेअरमन म्हणून काम करण्याची मुभा बीसीसीआयने का दिली?

यादीत क्रिकेटपटूंपैकी गावसकर, शास्त्री, गांगुली वगळता के. श्रीकांत, मुंबईचे लालचंद राजपूत, कर्नाटकचे वेंकटेश प्रसाद या क्रिकेटपटूंचीही नावे आहेत. दोन आठवड्यांच्या सुटीनंतर न्यायालयाची पुढील सुनावणी होईल.

वादग्रस्त नियम
बीसीसीआयने घटनेत बदल करून द्विहितसंबंध जपणा-या नियमाची मंजुरी घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाला तोच वादग्रस्त नियम रद्द करायचा आहे. तो नियम रद्द केल्याने कुणाकुणावर परिणाम होईल याची खातरजमा न्यायालयाला करायची आहे.