कोलकाता- भारताचा पुरुष एकेरीतील नंबर वन खेळाडू सोमदेव देववर्मनने कोलकाता एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत अँड्रियन मेनेडेझ मासेइरासला पराभूत केले. भारताच्या खेळाडूने 4-6, 6-1, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह त्याने अंतिम चारमधील प्रवेशही निश्चित केला. आता सोमदेवचा उपांत्य सामना इ. डोन्स्कोशी होईल.
सोमदेवला पहिल्या सेटमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे मोठा फटका बसला. मात्र, त्यानंतर घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करून त्याने दुसरा व तिसरा निर्णायक सेट आपल्या नावे केला. यापूर्वी त्याने ए. कुड्रात्सेवला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.