आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sport News In Marathi, IPL 7 Of The Bidding Process Finished, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केदार दिल्ली, तर विजय झोल बंगळुरू संघात, आयपीएल-7 ची बोली प्रक्रिया संपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - आयपीएल-7 साठी बोली प्रक्रियेच्या दुस-या दिवशी स्थानिक खेळाडूंनीच वर्चस्व राखले. पहिल्या दिवशी न विकलेले खेळाडू आणि अनकॅप्ड खेळाडूंवर गुरुवारी बोली लागली. रेल्वेचा करण शर्मा आयपीएलच्या अनकॅप्ड खेळाडूंच्या बोलीतील सर्वांत महागडा ठरला. त्याला हैदराबादने 3 कोटी 75 लाखांत खरेदी केले. अष्टपैलू ऋषी धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबने तीन कोटींत खेचले. संघ तयार करण्यासाठी आठ फ्रँचायझी संघांनी एकूण 628.10 कोटी रुपये खर्च केले. महाराष्‍ट्र रणजी संघाचा फलंदाज केदार जाधव दिल्ली तर विजय झोलची बंगळुरू संघात निवड झाली.
दोन दिवस चाललेल्या या लिलावात 514 खेळाडूंपैकी 154 खेळाडूंवर बोली लागली. यात 50 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. गुरुवारी मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेला चेन्नई सुपरकिंग्जने 1.50 कोटींत तर महाराष्‍ट्राच्या केदार जाधव आणि मयंक अग्रवालला दिल्ली डेअरडेव्हिल्सने अनुक्रमे 2 कोटी आणि 1.60 कोटी रुपयांत खरेदी केले. देशांतर्गंत खेळाडूंत रजत भाटियाला राजस्थान रॉयल्सने 1.70 कोटींत आणि धवल कुलकर्णीला 1.10 कोटींत खरेदी केले.
9 एप्रिलपासून आयपीएल-7
आयपीएल समितीने गुरुवारी स्पर्धेचे सातवे सत्र 9 एप्रिल ते 3 जूनदरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेतला. समितीने ही स्पर्धा भारतातच खेळवण्याचे संकेत दिले आहे. आयपीएल भारतात न झाल्यास आफ्रिकामध्ये खेळवण्याचा विचार केला जाईल. भारतात एप्रिल व मेमध्ये निवडणुका असल्याने भारतात स्पर्धा घेण्यात अडचणी येऊ शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात गृह मंत्रालयाच्या अधिका-यांनी होणा-या चर्चनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे आयपीएलच्या अधिका-यांनी सांगितले.
परवेज रसूलला मागणी : राष्‍ट्रीय संघात स्थान मिळवणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू परवेज रसूलला चांगली किंमत मिळाली. 20 लाख बेस प्राइस असलेल्या रसूलला सनरायझर्स हैदराबादने 95 लाखांत खरेदी केले. रसूलला घेण्यासाठी दिल्लीनेही बोली लावली होती. हैदराबादला केदारनंतर आणखी एका खेळाडूला राइट टू मॅच कार्डनुसार गमवावे लागले.
हैदराबादने मनदीपला 80 लाखांत खरेदी केले. मात्र, पंजाबने आपल्या कार्डचा उपयोग करून मनदीपला पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.
सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा..