वेलिंग्टन- भारताविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान रात्री मद्यप्राशन करून घातलेला ‘राडा’ जेसी रायडरला चांगलाच भोवला. या गैरवर्तनामुळे त्याचे आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे स्वप्नही भंगले. या स्पर्धेसाठी संघात विलीयसन, बोल्ट, रोनील हिरा आणि डेवकिचला पुनरागमनाची संधी देण्यात आली. या स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघ जाहीर करण्यात आला. अॅडम मिलने आणि मॅट हेन्रीला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली.