आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports Authority Of India News In Marathi, Divya Marathi, Balbeer Singh

‘साई’कडून गहाळ झाली बलबीरसिंग यांची गौरवचिन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - महान हॉकीपटू म्हणून जगविख्यात असलेल्या बलबीरसिंग (सीनियर) यांची काही गौरवचनि्हे स्पोर्ट््स अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) गहाळ केली असल्याचा आरोप स्वत: बलबीरसिंग यांनीच केला. या गलथान कारभाराबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत आसूड ओढले आहेत.
हॉकीत तीन वेळा सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या बलबीरसिंग यांचा त्या काळात मोठा दबदबा होता. त्यांनी १८८५ मध्ये साईचे तत्कालीन सचविए. एस. तलवार यांच्याकडे सोपवलेल्या गौरवचनि्हांमध्ये बलबीरसिंग यांचे ऑलिम्पिक ब्लेझर, टोकियो एशियाडचे पदक, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्याबरोबरची काही दुर्मिळ छायाचत्रिे, पदके आणि अन्य गौरवचनि्हे १९८५ मध्ये ‘साई’च्या प्रशासनाकडे सुपूर्द केली होती.

विक्रम अद्याप अबाधित
एका हॉकीपटूने विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात केलेल्या सर्वाधिक गोल्सचा विक्रम अद्यापही बलबीरसिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नेदरलॅँडविरुद्ध ५ गोल केल्याने भारताने तो सामना ६ -१ असा जिंकला होता.

असा झाला उलगडा
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने लंडनच्या ऑलिम्पिक प्रदर्शनात मांडण्यासाठी म्हणून बलबीरसिंग यांच्याकडे ब्लेझर देण्याची वनिंती केली. त्यानंतर बलबीरसिंग यांच्या नातवाने त्याबाबत ‘साई’कडे विचारणा केल्यानंतर त्यावर ती सर्व गौरवचिन्हे व ब्लेझर कुठे ठेवले आहे, ते त्यांना माहितीच नसल्याचे साईकडून कळवण्यात आले. त्यामुळे बलबीरसिंग यांनी अखेर त्यांचे सुवर्णपदक लंडनला पाठवून ते प्रदर्शनात मांडण्यात आल्याचे सांगितले.