आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्च्या मालासाठी स्पोटर्स कंपन्यांची धडपड, घसरत्या रूपयाचा परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - रुपयांच्या स्पर्धेत डॉलरचे भाव वाढल्याने स्पोर्ट्स इंडस्ट्रीसाठी कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे.
इंडस्ट्री 85 टक्के कच्च्या मालासाठी चीन आणि तैवानवर अवंलबून आहे. महागड्या डॉलरमुळे ट्रेडर्सने आयात रोखली आहे. दुसरीकडे स्टोरिएदेखील सक्रिय झाले आहेत. रबर केमिकल, पीयू आणि वैलक्रोमध्ये घट झाली आहे. प्लास्टिक मटेरियल, फोम कापड आणि धाग्याच्या किमतींमध्ये 25 टक्क्यांची वाढ झाली. यामुळे कच्च्या मालाच्या तुटवड्यासह स्पोर्ट्स प्रॉडक्टसची सरासरी 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे विदेशी ग्राहक दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत डिस्कांऊट मागत आहेत.

जालधंरमध्ये प्रत्येक वर्षी 675 कोटींचे स्पोटर्स गुड्स तयार होतो. 300 कारखाने आहेत. 250 कोटींची निर्यात होते. उर्वरित वस्तू भारतातील बाजारपेठेत विकल्या जातात. जालंधर येथील कंपन्या चीनच्या वस्तूवर आपल्या नावाच्या ब्रॅण्डखाली विक्री करतात. रुपयांच्या घसरणीचा सर्वांत मोठा परिणाम या कंपन्यांवर पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रॉडक्टची ऑर्डर बुक करते वेळी डॉलरची किंमत 58 रुपये होती. डिलिव्हरीपर्यंत ही किंमत 66 वर गेली. यामुळे स्थानिक कंपन्यांकडे लोकल कंपन्यांच्या ऑर्डरची शक्यता आहे. कच्चा माल मिळत नसल्याने स्थानिक मार्केटमध्येही अडचणी आहेत.


675 कोटींचे स्पोर्ट्स गुड्स तयार होतात दरवर्षी जालंधरमध्ये
232 कोटींची निर्यात
300 कारखाने आहेत स्पोटर्स वस्तूंचे


या आहेत समस्या
०क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स वियरचा कच्च माल महाग झाला आहे. उत्पादक कंपन्यांच्या नफ्यात 50 टक्क्यांची घसरण झाली.
० हेल्थ इक्युपमेंट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, गोल्फ किटच्या बाजारपेठेवर 85 टक्के चीन व तैवान कंपन्यांचे वर्चस्व आहे. दोन्ही देशांतून तयार वस्तूची मागणी करणा-यांच्या आयातीच्या किमतीत वाढ झाली. डॉलरची किंमत घसरल्याने महागड्या वस्तू स्वस्तात विकाव्या लागतात. नुकसानीची शक्यता असते.


नफा झाला 40 टक्क्यांनी कमी
स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये कपडा, फोम, रबरपासून प्लास्टिकपर्यंतचा कच्च माल 25 टक्क्यांपर्यंत महाग झाला आहे. मात्र, यामधून त्या झालेल्या स्पोर्ट्स किटची आम्ही किंमत वाढवू शकत नाही. यामध्ये नफा 30 ते 40 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.