आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा मंत्रालयाला महत्त्व मिळवून देणार, नवनियुक्त क्रीडामंत्री सोनोवाल यांचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालय हे स्वतंत्र उठून दिसणारे बनवण्यासह या मंत्रालयास महत्त्व मिळवून देण्याचे माझे ध्येय असल्याचे नूतन केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.
क्रीडा मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सोनोवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. आसामच्या लखीमपूर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर केंद्रात क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याचा आनंददेखील त्यांनी व्यक्त केला. या मंत्रालयाला सक्षम करण्याच्या उद्देशाने मला माध्यमांचे व देशवासीयांचे सहकार्य अपेक्षित आहे.

तज्ज्ञांशी चर्चा करून प्राधान्यक्रम
क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा माझा मानस आहे. यात विचारविनिमय करून प्राधान्यक्रम निश्चित करणार आहे. त्यानंतरच विचार मांडणार असल्याचे ते म्हणाले.

पाकसह सर्व देशांशी चांगले संबंध
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकसह प्रत्येक शेजारी राष्ट्राशी संबंध चांगले राखण्याचा माझादेखील प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्याबाबत आशावादी असल्याचेही सोनोवाल यांनी नमूद केले.