आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports Ministry Confirms Khel Ratna For Ronjan Sodhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंजन सोढीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पुनियाचा दावा फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावरून सुरू असलेल्या वादावर अखेर गुरुवारी पडदा पडला. माजी नंबर वन डबल ट्रॅप नेमबाज रंजन सोढीला खेलरत्न पुरस्कार मिळणार असल्याची क्रीडा मंत्रालयाने घोषणा केली. त्याला साडेसात लाख रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. सोढीने 2010 राष्‍ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य आणि याच वर्षी ग्वांग्झू आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने 2010 मध्ये विश्वचषकही जिंकला होता.

माजी वर्ल्ड बिलियडर्स चॅम्पियन मायकेल फरेरा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने तयार केलेल्या यादीला केंद्र शासनाने मंजुरी दिली आणि यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यासह शासनाने थाळीफेकपटू कृष्णा पुनियाचा खेलरत्न मिळवण्याचा दावाही फेटाळून लावला. केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादील गुरुवारी अंतिम मंजुरी दिली. मागील आठवड्यात तयार करण्यात आलेल्या यादीत कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याची सूत्रांनी माहिती दिली. येत्या 31 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.