आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports News In Marathi, Victory Azarenka, Divya Marathi

ओपन टेनिस स्पर्धा: अझारेंकाची विजयी सलामी; लिसिका बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंकाने जपान पॅन पॅसिफिक ओपन टेनिस स्पर्धेत दमदार सुरुवात केली. तिने यजमान जपानच्या किमिको दाते-क्रुमचाला घरच्या मैदानावर धूळ चारली. अझारेंकाने महिला एकेरीच्या सलामी सामन्यात ३-६, ६-०, ६-२ अशा फरकाने शानदार विजय मिळवला. याशिवाय तिने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. दमदार सुरुवात करताना जपानच्या किमिकाने घरच्या मैदानावर पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. याशिवाय तिने बलाढ्य अझारेंकाविरुद्ध लढतीत आघाडीही मिळवली होती. मात्र, तिला दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये आपले आव्हान कायम ठेवता आले नाही. बेलारूसच्या खेळाडूने शानदार पुनरागमन करताना दुसरा आणि तिसरा सेट सहज जिंकून सामना आपल्या नावे केला.

कार्ला सुआरेझची आगेकूच
स्पेनच्या कार्ला सुआरेझने महिला एकेरीत विजयी सलामी देत स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तिने पहिल्या फेरीत जपानच्या कुरुमी नाराचा पराभव केला. तिने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-१, २-६, ६-२ ने जपानच्या नाराला घरच्या मैदानावर पराभूत केले. दुसऱ्या सेटमध्ये जपानच्या खेळाडूने पुनरागमन करून बराेबरी साधली हाेती. मात्र, तिचा तिसऱ्या सेटमध्ये निभाव लागला नाही.

सब‍िना लिसिकाचा धक्कादायक पराभव
जर्मनीच्या सब‍िना लिसिकीला महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. तिला ऑस्ट्रेलियाच्या केसी डेल्लासक्युआने पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या २९ वर्षीय केसीने ६-७, ७-५, ६-२ अशा फरकाने विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही तिने दमदार पुनरागमनासह सामना जिंकला.