आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्टस पर्सन ऑफ द वीक : मॅग्नस कार्लसन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्वेचा हा 22 वर्षीय युवा बुद्धिबळपटू विश्वविजेतेपदा सोबतच विश्व क्रमवारीतसुद्धा अव्वलस्थानी आहे. नुकत्याच चेन्नईत पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत त्याने पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदला हरवले.
मॉडेलिंग आणि अभिनय
खट्याळ स्वभावाच्या कार्लसनला चित्रपटात अभिनयासोबतच मॉडेलिंग करणेही आवडते. काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेत्री लिव्ह टेलर सोबत जी-स्टार रॉच्या एका जाहिरातीत काम केले आहे. या व्यतिरिक्त मागच्या वर्षी त्याने ‘द कॉलबर्ट रिपोर्ट’ या 60 मिनिटांच्या चित्रपटात काम केले आहे.
सेक्सिएस्ट पर्सन-2013
कॉस्मोपॉलिटिन या नियतकालिकाने कार्लसनला या वर्षीचा ‘सेक्सिएस्ट पर्सन’ पुरस्कार दिला आहे. महिलांसाठीचे हे आंतरराष्‍ट्रीय नियतकालिक सन 1886 पासून प्रकाशित केले जात आहे.
सेमी कंडक्टर ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेची कंपनी अल्ट्रा लो पॉवर वायरलेस सिस्टिम ऑन चिप्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. ही कंपनी वायरलेस माऊस, की-बोर्ड आणि खेळांच्या साधनांचे उत्पादन करते.