आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे खेळाडू मैदानावर झाले हिट, अन् रुपेरी पडद्यावर झाले टाय टाय फिशsss

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्‍यपणे चित्रपटांत काम करणे अनेकांचे स्‍वप्‍न असते. परंतु, उराशी बाळगलेले हे स्‍वप्‍न पूर्ण होईल याची काही शाश्‍वती नसते. अनेकजण या मायानगरीत दाखल तर होतात. पण प्रत्‍येकालाच इथे यश मिळण्‍याची किंवा स्थिरस्‍थावर होण्‍याची संधी मिळेलच याची खात्री नसते. शेवटी यातील काहीजण आपला मार्ग बदलतात. तर काहीजणांचं आयुष्‍यच स्‍ट्रगलमध्‍ये जाते. परंतु, म्‍हणावी तशी संधी त्‍यांना काही मिळू शकत नाही.

हे झालं सर्वसामान्‍य लोकांचं. पण सेलिब्रिटींबद्दल हीच बाब थोडी सोपी जाते असे म्‍हटलं तर वावगं ठरणार नाही. सेलिब्रिटी मग ते उद्योग क्षेत्रातील असो किंवा क्रीडा विश्‍वातील. आपल्‍या क्षेत्रात यशस्‍वी ठरलेल्‍या या सेलिब्रिटींना चित्रपटात मात्र सहजच प्रवेश मिळतो. यातील अनेकजणांना तर अभिनयाचा गंधही नसतो. परंतु, आपल्‍या ग्‍लॅमरचा फायदा उठवण्‍यासाठी ही मंडळी अभिनयातही हात आजमावून पाहतात. काहींना यश मिळते तर काही जणांचा पहिला चित्रपट हा शेवटचा ठरतो. देशविदेशातील असे अनेक कलाकार आहेत ज्‍यांना चित्रपटांत चमकण्‍याचा मोह झाला. काहींची कारकीर्द अजून सुरूच आहे तर काहींनी चित्रपटाला रामरामही केला आहे. टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज विनोद कांबळी असो किंवा टेनिसच्‍या कोर्टवरील चेन्‍नई एक्‍स्‍प्रेस लिएंडर पेस किंवा महाबली खली असो प्रत्‍येकांनी चित्रपटात काम करून अभिनयातही आपलं नाणं वाजवून पाहिलं आहे. आज आम्‍ही अशाच काही भारतातील आणि भारताबाहेरील क्रीडा विश्‍वातील व्‍यक्‍तींबाबत सांगणार आहोत ज्‍यांनी हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्‍ये आपली छाप सोडण्‍याचा प्रयत्‍न केला. विनोद कांबळीने केला 'अनर्थ' तर जडेजाचा झाला 'खेल खल्‍लास', वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...