आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spot fixing Scandal: Jagdale To Meet Delhi Police Cops

स्‍पॉट फिक्सिंग: दिल्‍ली पोलिसांनी केली संजय जगदाळेंची चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली पोलिसांनी आयपीएलचे आर्थिक मॉडेल समजून घेण्‍यासाठी बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांची चौकशी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, जगदाळेंना राजस्‍थान रॉयल्‍स टीम आणि क्रिकेटपटूंदरम्‍यान झालेल्‍या करारात बीसीआयची भूमिका समजावून घेण्‍यासाठी बोलावण्‍यात आले होते.

राजस्‍थान रॉयल्‍सने कराराचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी अटकेत असलेले तीन खेळाडू एस श्रीसंत, अजित चंदिला आणि अंकित चव्‍हाण यांच्‍याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका पोलिस अधिका-याने जगदाळें यांना चौकशीसाठी बोलावले नसून फक्‍त त्‍यांच्‍याकडून काही गोष्‍टी समजावून घेण्‍याचा प्रयत्‍न केला, असे म्‍हटले. जगदाळे यांनी मागील आठवडयात बीसीसीआयच्‍या सचिव पदाचा राजीनामा दिला होता.