आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spot Fixing: Srinivas Probing Committee Only For The Meiyppan

स्‍पॉट फ‍िक्सिंग: श्रीनिवास यांनी नेमलेली समिती मय्यपनच्या बचावासाठीच !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडियन प्रीमियर लीगमधील सट्टेबाजीच्या चौकशीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बीसीसीआय) अध्यक्षपदावरून तात्पुरते बाजूला झालेले एन. श्रीनिवासन यांनी नेमलेली त्रिसदस्यीय समिती केवळ देखावा असून त्यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पन याचा बचाव करण्याचा समितीचा उद्देश असल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात नुकतीच दाखल झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


बिहार क्रिकेट संघटनेने याचिका दाखल केली आहे. आपला जावई आयपीएलमधील सट्टेबाजीत अडकल्याचे आरोप होऊ लागल्यानंतर श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा तात्पुरता राजीनामा दिला. परंतु खुद्द श्रीनिवासन इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष आहेत. चेन्नईची मालकी असून गुरुनाथ टीम प्रिन्सिपल आहेत.