आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sreesanth, Chandila, Chavan Face May Be Life Time Ban In Cricket

फिक्सिंग प्रकरणातील खेळाडूंवर आजन्‍म बंदी येण्‍याची शक्‍यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आयपीएलच्‍या सहाव्‍या हंगामात स्‍पॉट फिक्सिंग करणा-या श्रीसंत, अंकित चव्‍हाण आणि अजित चंदिलावर आजीवन बंदी येण्‍याची शक्‍यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्‍या एक सदस्‍यीय चौकशी समितीने आपला अहवाल सोपवला आहे.

बीसीसीआयच्‍या भष्‍ट्राचार विरोधी पथक आणि सुरक्षा युनिटचे प्रमूख रवी सवानी यांनी आपल्‍या अहवालात तिन्‍ही खेळाडूंना दोषी ठरवले आहे. त्‍याचबरोबर त्‍यांच्‍यावर आजीवन बंदी घालण्‍याची शिफारसही केली आहे. बीसीसीआयच्‍या एका वरिष्‍ठ अधिका-याने या वृत्तास दुजोरा दिला आहे.

खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्‍याचा निर्णय कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत त्‍यांना दोषी ठरवल्‍यानंतर घेण्‍यात येणार आहे. तिन्‍ही खेळाडूंना 16 मेपर्यंत दिल्‍ली पोलिसांच्‍या स्‍पेशल सेलने अटक केली होती. दिल्‍ली पोलिसांनी तिघांवर मोक्‍का लावला आहे.