आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरच्‍या ललनेबरोबर श्रीसंतचे फिक्सिंग, पुढच्‍या महिन्‍यात मंदिरात करणार लग्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणात फसलेला टीम इंडियाचा आणि राजस्‍थान रॉयल्‍सचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुढच्‍या महिन्‍यात लग्‍न करीत आहे. माध्‍यमांमध्‍ये येत असलेल्‍या वृत्तानुसार श्रीसंत 12 डिसेंबरला केरळच्‍या एका मंदिरात लग्‍न करणार आहे. अद्याप त्‍याच्‍या जीवनसाथीच्‍या नावाचा खुलासा मात्र झालेला नाही.

श्रीसंत ज्‍या मुलीबरोबर लग्‍न करणार आहे, ती जयपूरची असल्‍याचे बोलले जात आहे. हे दोघेही गेल्‍या 4 वर्षांपासून एकमेकांच्‍या संपर्कात असल्‍याचे सांगितले जाते.

आयपीएल स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणाच्‍या चौकशीत श्रीसंतचे नाव जयपूरच्‍या साक्षी झालाशी जोडण्‍यात आले होते. याच साक्षीबरोबर श्रीसंत लग्‍न करणार असल्‍याचे समजते.

आयपीएल स्‍पॉट फिक्सिंगमध्‍ये श्रीसंत आणि साक्षीवरून मोठे खुलासे बाहेर आले होते. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्‍नी साक्षीचेही श्रीसंतच्‍या साक्षीबरोबर कनेक्‍शन समोर आले होते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा श्रीसंतचे साक्षी कनेक्‍शन आणि यापूर्वी श्रीसंतचे कोणा-कोणाबरोबर जोडण्‍यात आले होते नाव...