आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sreesanth To A Special Judge On The Ground That MCOCA Is Invoked In IPL Fixing Case.

श्रीसंत-चव्‍हाण-चंदिलावर \'मोक्‍का\', वर्षभर राहणार तुरूंगात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आयपीएलमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंग केल्‍याचा आरोप असलेल्‍या श्रीसंत, अंकित चव्‍हाण आणि अजित चंदिलासह 26 जणांवर दिल्‍ली पोलिसांनी मोक्‍का लावण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे आता या आरोपींना किमान एक वर्षभर जामीन मिळण्‍याची शक्‍यता नाही.

मोक्‍का लावण्‍यात आल्‍यामुळे या प्रकरणाची सुनावणी मोक्‍काच्‍या विशेष न्‍यायालयात होणार आहे. मोक्‍कामध्‍ये जामीन याचिकेवर सुनावणीदेखील होऊ शकत नाही. जर आरोप सिद्ध झाला तर या सर्वांना पाच-पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.

मोक्‍काअंतर्गत दिल्‍ली पोलिसांना आता चार्जशीट दाखल करण्‍यासाठी 90 दिवसांऐवजी 180 दिवसांचा वेळ मिळेल. इतकेच नव्‍हे तर फिक्सिंगशी निगडीत प्रकरणी जो जबाब आरोपी पोलिसांसमोर देतील तो त्‍यांचा कबुलीनामा समजला जाईल.