आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Consign Netherlands To Record Low News In Marathi

टी-20 : हॉलंडचा 39 धांवात खुर्दा; श्रीलंका विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - श्रीलंका संघाने आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा विजय मिळवला. या टीमने सोमवारी दुबळ्या हॉलंडवर 9 गड्यांनी मात केली.

पात्रता फेरीतील चमकदार कामगिरीने हॉलंडने वर्ल्डकपच्या सुपर-10 मध्ये धडक मारली. मात्र, अद्याप हॉलंडला बलाढय़ संघाविरुद्ध विजय मिळवता आला नाही. या टीमला स्पर्धेत सलग दुसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.

मॅथ्यूज, मलिंगा आणि मेंडिस यांनी घातक गोलंदाजी करून हॉलंडचा 10.3 षटकांत अवघ्या 39 धावांत खुर्दा उडवला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 5 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. दिलशान (नाबाद 12), जयवर्धने (नाबाद 11) आणि सलामीवीर परेरा (14) यांनी केलेल्या खेळीच्या बळावर श्रीलंकेने सामना जिंकला. चार षटकांत 16 धावा देत तीन बळी घेणारा मॅथ्यूज सामनावीरचा मानकरी ठरला. आता श्रीलंकेचा तिसरा सामना गुरुवारी इंग्लंडशी होईल.

तत्पूर्वी हॉलंडकडून टॉम कुपरने सर्वाधिक 16 धावा काढल्या. इतर सर्व फलंदाज धावांचा दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत.

हॉलंडचा विक्रम
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये हॉलंडने विक्रमाची नोंद केली. या टीमने श्रीलंकेविरुद्ध नीचांक 39 धावा काढण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम केनियाने सप्टेंबर 2013 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 56 धावा काढून केला होता.