नवी दिल्ली - आगामी वनडे वर्ल्डकपचा विचार केला तर श्रीलंकेचा संघ मला सर्वाधिक संतुलित आणि उत्तम वाटतो. मी या संघाला "वेल बॅलेंस' म्हणेल. श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत चमत्कारिक कामगिरी करू शकतो, असे मत भारताचा माजी कर्णधार
राहुल द्रविडने व्यक्त केले.
"हा अत्यंत चांगला संघ आहे. शिवाय योग्य संतुलनही साधलेले आहे. त्यांच्याकडे काही चांगले अनुभवी फलंदाजही आहेत. संगकारा, जयवर्धने आणि दिलशानच्या समावेशाने श्रीलंकेचा संघ अधिक मजबूत आहे. या फलंदाजांचा अनुभव अडचणीच्या वेळी कामी येईल,' असेही तो म्हणाला. गोलंदाजीतही श्रीलंकेकडे विविधता आहे. लंकेकडे काही चांगले फिरकीपटू आहे. सचित्रा सेनानायके आणि रंगना हेराथ अव्वल दर्जाचे फिरकीपटू आहेत.