आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हवेत उडी मारूनही सुटली कॅच, तरीही बॅट्समन झाला आऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डूनेडिन - क्रिकेटच्या मैदानात दररोज काहीतरी वेगळे पाहायला मिळते. न्यूझिलंड आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या सामन्यातही असेच काहीतरी झाले. सात सामन्यांच्या या एकदिवसीय शृंखलेतील सहाव्या सामन्यात न्यूझिलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्कूलम याने चेंडू झेलण्यासाठी हवेत शानदार उडी मारली, मात्र त्याच्याकडून झेल सुटला. यानंतर जे काही झाले ते पाहून सर्वच प्रेक्षक आणि खेळाडू हैराण झाले. झाले असे की, श्रीलंकेचा खेळाडू दिनेश चांडीमल याचा झेल सुटल्यानंतर ब्रँडन मॅक्कूलमने वेळ वाया न घालवता चेंडू यष्टीरक्षक रोंचीकडे फेकला. ब्रँडनचा निशाणा एवढा पक्का होता की, रोंचीने दिनेशला रनआऊट केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेंडू पुन्हा उचलताना त्यांचे शरीर जमीनीवर नसून ते पूर्ण हवेत होते. या निर्णयासाठी थर्ड अंपायरकडे विनंती करण्यात आली होती.

विलियम्सन-रॉस टेलर-कोरी एंडरसन रहे जीत के हीरो
केन विलियम्सने (97) आणि रॉस टेलर (96) यांच्या शानदार खेळीने आणि कोरी एंडरसन (52 धावांवर चार गडी बाद) याच्या मदतीने न्यूझिलँडने रविवारी सहाव्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला 120 धावांनी हारवत सात सामन्यांच्या सिरिजमध्ये 4-1 ने बढत मिळवत आपला विजय निश्चित केला. न्यूझिलंडने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकूण 50 षटकांमध्ये न्यूझिलंडने आठ गडी बाद 315 धावा केल्या, तर श्रीलंका 40.3 षटकांमध्ये केवळ 195 धावाच काढू शकली.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, या संपूर्ण घटनेचे फोटो आणि शेवटच्या स्लाईडवर या घटनेचा VIDEO ....