लॉर्ड्स.- कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि गोलंदाज धम्मिका प्रसादच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडच्या संघाला त्यांच्या मायदेशात पराभूत केले. हेडिंगलेमध्ये झालेल्या दुसऱ्या आणि निर्णायक लढतीमध्ये श्रीलंकेने 100 धावांनी विजयी मिळविला. श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली. आशियाई संघाने 16 वर्षानंतर ही मालिका जिंकली आहे.
श्रीलंकेने इंग्लंडला सामन्याच्या शेवटच्या चरणात 350 धावांचे लक्ष्य दिले होते. तरूण फलंदाज मोइन अलीच्या नाबाद शतकाच्या बळावर इंग्लंडने हा सामनादेखील ड्रॉ करायची तयारी केली होती. परंतु शेवटचा चेंडू टाकायच्या आधीच शमिंडा एरांगाने रंगना हेराथकरवी जेम्स अँडरसनला झेल टिपून श्रीलंकेला सामना जिंकून दिला.
इंग्लंड संघ 249 धावावर सर्वबाद झाला. मोइन अली 108 धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेसाठी धम्मिका प्रसादने 50 धावा देऊन 5 विकेट मिळवल्या. रंगना हेराथने 3, नुवान प्रदीप आणि एरांगाने प्रत्येकी 1-1 फलंदाजांना बाद केले.
16 वर्षानंतर मिळाला मालिकेत विजय
श्रीलंकेचा हा 8वा इंग्लंड दौरा होता. याआधी 1998मध्ये अर्जुना रणतुंगा कर्णधार असताना श्रीलंकेने कसोटी मालिका जिंकली होती. केनिंग्टन ओवलमध्ये झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 10 धावांवर विजय मिळवला होता.
16 वर्षानंतर अँजेलो मॅथ्युजच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कसोटी मालिका जिंकली आहे. तोच या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.
(फोटोओळ- जेम्स अँडरसन (सगळ्यात वर) ला बाद केल्यानंतर मालिकेतल्या विजयाचा उत्सव साजरा करताना श्रीलंकन खेळाडू)
पुढच्या स्लाईड्सवर वाचा, श्रीलंकेच्या कसोटी मालिकेत विजयात हिरो ठरला कर्णधार मॅथ्युज