आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Wins Twenty 20 Cricket World Cup Ranking News In Marathi

श्रीलंका अव्वलस्थानी विराजमान, टीम इंडियाची दुस-या स्थानावर घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - श्रीलंका संघ पुन्हा एकदा आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. रविवारी टी-20 विश्वचषक पटकावून श्रीलंकेने हे स्थान गाठले. भारताची दुस-या स्थानावर घसरण झाली.
श्रीलंकेने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतावर मात केली. या विजयासह श्रीलंका पुन्हा एकदा जगातील नंबर वन टीम ठरली आहे. अवघ्या तीन गुणांच्या आघाडीने श्रीलंकेने हे स्थान गाठले. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत श्रीलंकेने 133 गुणांसह अव्वल स्थानावर बाजी मारली. वर्ल्डकपमधील उपविजेता भारतीय संघ 130 गुणांसह दुस-या स्थानी आहे.
पूनम, हरमनप्रीत टॉप-10 मध्ये
आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी-20 च्या क्रमवारीत भारताच्या पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौरने टॉप-10 मध्ये धडक मारली. यात पूनमने आठवे आणि हरमनप्रीतने नवव्या स्थानी धडक मारली.
टी-20 टॉप-10 क्रम टीम गुण
1. श्रीलंका 133
2. भारत 130
3. पाकिस्तान 120
4. द.आफ्रिका 118
5. वेस्ट इंडीज 114
6. ऑस्ट्रेलिया 110
7. न्यूझीलंड 107
8. इंग्लंड 101
9. आयर्लंड 85
10. बांगलादेश 71