आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lankan Cricketer Mahela Jayawardene Love Story, Mahela Jayawardene Retirement

आठ वर्ष डेटिंग केल्‍यानंतर या श्रीलंकन खेळाडूने थाटला संसार, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - भारतामधील प्रेमाचे प्रतीक ताज महाल समोर माहेला जयवर्धने आणि पत्‍नी क्रिस्‍टीना)
नुकत्‍याच झालेल्‍या पाकिस्‍तान - श्रीलंका कसोटीमध्‍ये लौकिकाला साजेशी खेळी करुन निवृत्‍ती स्विकारणारा फलंदाज महेला जयवर्धने एक दिग्‍गज क्रिकेटपटू आहे. त्‍याने 148 कसोटीमध्‍ये 11756 धावा आणि 420 एकदिवसीय सामन्‍यामध्‍ये 11681 धावा केल्‍या. झटपट धावा घेणारा जयवर्धने खासगी आयुष्‍यात फार शांत आणि संयमी आहे. त्‍याने तब्‍बल आठ वर्ष डेटिंग केल्‍यानंतर लग्‍न केले होते.
खुप कमी लोक जाणतात की माहेला जयवर्धने आणि त्‍याची पत्‍नी क्रिस्‍टीना श्रीसेना यांच्‍यामध्‍ये तब्‍बल आठ वर्षांचे अफेअर होते. त्‍यानंतर या युगलांनी 3 नोव्‍हेंबर 2005 रोजी लग्‍न केले.
कॉमन फ्रेंडने घालून दिली भेट
या लव्‍हस्‍टोरीचा खुलासा खुद्द क्रिस्‍टीनाने केला होता. एका मुलाखतीदरम्‍यान तिने सांगितले होते की, 'जयवर्धने आणि आपली भेट एका कॉमन मित्राने घालून दिली होती. त्‍याचे नाव अविष्‍का गुणवर्धने असून तो महेलासोबत क्रिकेट खेळत असे. त्‍यावेळी क्रिस्‍टीना 'एअर लंका' मध्‍ये काम करत होती'.
भारतामध्‍ये झाले शिक्षण
माहेला जयवर्धनेची पत्‍नी क्रिस्‍टीनाने बंगळुरुच्‍या माउंट कार्मेल कॉलेजमध्‍ये शिक्षण घेतले. त्‍यावेळी ती दोन वर्ष भारतामध्‍ये राहिली. क्रिस्‍टीना आणि माहेलाला एक मुलगी आहे. तिचे नाव संसा आर्या आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, जयवर्धने, क्रिस्‍टीना आणि त्‍यांच्‍या मुलीचे छायाचित्रे..