Home | Sports | Expert Comment | Sri Lankan Cricketers Get Ultimatum From Government

क्रीडामंत्र्यांना माकड म्हटल्याने मलिंगावर आधी बंदी, आता संघातून हकालपट्टीचा इशारा

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 30, 2017, 12:33 PM IST

मलिंगासह श्रीलंकन क्रिकेटरांना अल्टीमेटम, फीट व्हा नाहीतर संघातून हकालपट्टी!

 • Sri Lankan Cricketers Get Ultimatum From Government
  वरिष्ठ गोलंदाज लसिथ मलिंगा दुखपतीच्या कारणाने संघातून आत- बाहेर होत असतो. तो 2016 मध्ये टी- 20 वर्ल्ड कप आणि नंतर आयपीएल सुद्धा खेळू शकला नव्हता. क्रीडामंत्र्याला माकड असे म्हटल्याने त्याच्यावर 6 महिन्यांची बंदी घातली आहे.
  स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर श्रीलंकन क्रिकेटपटूंच्या अडचणी कमी व्हायला तयार नाहीत. श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयासेकरा यांना माकड असे म्हटल्याने श्रीलंकन सरकारने मंगळवारी रात्री वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगावर बंदी घातली. त्यानंतर, आता श्रीलंकन सरकारने आपल्या क्रिकेटपटूंना ताकीद देताना तीन महिन्यांच्या फिट होण्यास सांगितले आहे. खेळाडू तीन महिन्यांत फिट झाले नाही तर त्यांना संघाबाहेर केले जाईल, असे क्रिकेटपटूंना सांगण्यात आले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंकन सरकारने हा निर्णय घेतला. झिम्बाब्वेविरुद्ध पाच वनडे आणि एक कसोटीची मालिका श्रीलंकेला शुक्रवारपासून खेळायची आहे. संघाच्या निवडीच्या वेळी बहुतेक खेळाडूंचे फिटनेस योग्य नसल्याचे आढळले. यानंतर सरकारने खेळाडूंना अल्टिमेटम दिला. काय म्हणाले श्रीलंकन क्रीडामंत्री...
  - श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयासेकरा म्हणाले, 'कोणत्याही खेळाडूचे फिटनेस योग्य नाही. यामुळे मी हा कडक निर्णय घेतला आहे.
  - तंदुरुस्त चाचणीत ११ खेळाडू अनफिट ठरले. अनेक खेळाडूंचे वजन खूप वाढले आहे. त्यांचा फिटनेस आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही.
  - वेगवान गोलंदाज लेसिथ मलिंगाचे वजन तर ८० किलोपर्यंत वाढले आहे. वाढत्या वजनामुळे त्याचा फिटनेस सुमार झाला आहे. तो वारंवार जखमी होत असतो.
  - फक्त दोन खेळाडू दुष्मांथा चामिरा आणि लाहिरू मदुशंका यांचा फिटनेस चांगला आहे. खेळाडूंना फिट राहण्यासाठी आर्मीसारखी ट्रेनिंग द्यावी लागेल.'
  वजन कमी न केल्यास संघातून हकालपट्टी-
  - कोणत्याही खेळाडूत १६ टक्के बॉडी फॅट सामान्य आहे. मात्र, श्रीलंकेच्या खेळाडूंत हे २६ टक्क्यांपर्यंत आहे.
  - तीन महिन्यांनंतर ज्या खेळाडूचे बॉडी फॅट १६ टक्क्यांपेक्षा अधिक असेल त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
  - श्रीलंकेच्या संघाची निवड स्वतंत्र समिती करते. मात्र, क्रीडा मंत्र्याच्या उपस्थितीनंतर खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात.
  - लंकेच्या क्रीडामंत्र्यांनी याआधीसुद्धा फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर लसिथ मलिंगाला याबाबत छेडले असता त्याने क्रीडामंत्र्यांना माकड असे संबोधले होते. यामुळे त्याच्यावर आता सहा महिन्याची बंदी घातली आहे.
  पुढे स्लाईडद्वारे पाहा, किती आणि कोण कोण श्रीलंकन क्रिकेटर आहेत अनफीट...
  सोबतच वाचा, काय प्रकरण मलिंगा आणि माकड म्हटल्याचे....

 • Sri Lankan Cricketers Get Ultimatum From Government
  लसिथ मलिंगा...
  काय प्रकरण मलिंगा आणि माकड तुलनेचे-
   
  - चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेच्या सुमार प्रदर्शनावर लंकेचे क्रीडामंत्री जयसेकरा यांनी टीका केली होती. शिवाय भविष्यात खेळाडूंची निवड करताना फिटनेसचा विचार केला जाईल, असे म्हटले होते. 
  - यानंतर मलिंगाने क्रीडामंत्र्यांना प्रत्युत्तर दिले होते. झेल कोणाकडूनही सुटू शकतात, असे मलिंगा म्हणाला होता. 
  - यानंतर मलिंगा म्हणाला होता, “एका माकडाला पोपटाच्या घराबद्दल काय माहिती असणार? एक माकड पोपटाच्या घरात बसून त्याच्याच घराबद्दल बोलत आहे, असे वाटते.’ 
  - मलिंगाच्या या टीकेनंतर जयसेकरा म्हणाले, मी खेळाडूंच्या फिटनेसवर बोललो होतो. मी एकाही खेळाडूचे नाव घेतले नव्हते. मात्र, मलिंगाने माझे नाव घेतले आणि माझा सार्वजनिक अवमान केला आहे, असेही त्यांनी म्हटले.
  - वेगवान गोलंदाज लेसिथ मलिंगावर श्रीलंका क्रिकेट मंडळाने (एसएलसी) शिस्तभंगाची कारवाई करताना सहा महिन्यांची बंदीची शिक्षा सुनावली आहे. 
  - श्रीलंका क्रिकेटचे मानद सचिव मोहन डिसिल्वा, मंडळाचे सीईओ अॅश्ले डिसिल्वा आणि शिस्तभंग कारवाई समितीचे अध्यक्ष रेकवा आलवाली यांच्या विशेष चौकशी समितीने मलिंगाला करार मोडल्याप्रकरणी दोषी ठरवले. 
  - चौकशी समितीसमोर मलिंगाने आपली चूकही मान्य केली आणि औपचारिक माफी मागितली. यानंतर समितीने मलिंगाच्या एक वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला कमी करत सहा महिने केले. 
  - याशिवाय पुढच्या वनडे सामन्याच्या सामनेनिधीतून ५० टक्के रक्कम कपातीचाही दंड लावण्यात आला.
  - श्रीलंकेला ३० जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध ५ वनडे आणि एक कसोटी सामना खेळायचा आहे.
  - मलिंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंकेची गोलंदाजी दुबळी होईल. मलिंगा लंकेच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे.
 • Sri Lankan Cricketers Get Ultimatum From Government
  श्रीलंकन कर्णधार अॅंजिलो मॅथ्यूज सध्या दुखापतीने त्रस्त आहे.
 • Sri Lankan Cricketers Get Ultimatum From Government
  मॅथ्यूज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीच जखमी होता. त्यामुळे तो दक्षिण अफ्रिकेविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्याच सामन्याला मुकला होता.
 • Sri Lankan Cricketers Get Ultimatum From Government
  श्रीलंकन बॅट्समन चमारा कापूगेदराला चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सरावाच्या वेळी गुडघ्याला जखम झाली होती. त्यामुळे तो टूर्नामेंटमधून बाहेर झाला होता. श्रीलंकेला हा झटका टूर्नामेंटमध्ये भारताविरूद्धच्या मॅचआधीच लागला होता.

Trending