फोटो - प्रतिकात्मक
पुढल्या वर्षी म्हणजे 2015 साली व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान देशांमध्ये आयोजित होणारा क्रिकेटचा हा महाकुंभ भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताने गेल्यावेळी म्हणजे 2011 मध्ये झालेल्या विश्वचषकात विजेतेपद मिळवत जागतिक क्रिकेटमध्ये
आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांत झालेल्या मालिकांमध्ये भारतीय संघाची कामगिरी संमिश्र म्हणावी अशीच राहिलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तर भारताची चांगलीच घसरण झाली.
या सर्वाचा विचार पुढील वर्षी होणा-या विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेविरुद्ध सध्या सुरू असलेली मालिका भारतीय संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणूनच या मालिकेकडे पाहिले जात आहे. त्याच दृ़ष्टीने मालिकेत काही प्रयोगही करण्यात आले आहेत. त्या सर्वांचा उद्देश आगामी विश्वचषक स्पर्धा हाच असल्याचे समजले जात आहे. वेस्ट इंडिज बरोबरचा भारताचा दौरा अर्ध्यातच रद्द करावा लागल्याने भारतीय संघाला व्यवस्थित आपले शक्तीस्थान आणि त्रुटी याबाबत विचार करण्यास फारशी संधी मिळाली नव्हती. पण आता श्रीलंकेबरोबरच्या या मालिकेवर निवड समितीचे बारीक लक्ष असणार आहे. कारण जगज्जेतेपद राखण्यासाठी अत्यंत अचूक संघाची निवड करण्याची जबाबदारी निवड समितीवर असेल. त्यासाठी या मालिकेतून ते निर्णय घेण्यासाठी सलेक्टर्सना मदत मिळणार आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या का महत्त्वाची आहे श्रीलंकेविरुद्धची मालिका