आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka's Star Batsman Kumar Sangakkara News In Divya Marathi

संगकाराला नव्या विक्रमाची संधी, कसोटी करिअरमधील 11 वे द्विशतक ठोकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन- यंदाचे नवीन वर्ष श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुमार संगकारासाठी लकी ठरले आहे. त्याने नव्या वर्षाच्या तिस-याच दिवशी शनिवारी कसोटीत १२ हजार धावांचा पल्ला गाठला. याशिवाय त्याने रविवारी द्विशतकासाठी नव्या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर धडक मारली. कुमार संगकाराने रविवारी २०३ धावांची खेळी केली. यासह श्रीलंका संघाने न्यूझीलंडविरुद्ध ३५६ धावा काढल्या. त्यामुळे श्रीलंकेने १३५ धावांनी आघाडी घेतली. यात संगकारापाठोपाठ दिनेश चांदीमलने ६७ धावांचे योगदान दिले. तसेच त्याने संगकारासोबत १३० धावांची भागीदारी केली. संगकाराने ३०६ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार आणि तीन षटकारांसह २०३ धावा काढल्या. गोलंदाजीत न्यूझीलंडच्या ब्रेसवेल आिण जेम्स निशामने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या आहे.

ब्रॅडमनला टाकणार मागे
संगकाराने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीच्या दुसऱ्या दिवशी करिअरमधील ११ व्या द्विशतकाची नोंद आपल्या नावे केली. यासह त्याला आता ब्रॅडमनच्या सर्वाधिक द्विशतकाच्या विक्रमाला मागे टाकण्याची संधी आहे. डॉन यांच्या नावावर १२ द्विशतकांची नोंद आहे. तसेच संगकाराने लेन हटन आणि ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली.