आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अझहरच्या शतकाने पाकची 188 धावांची आघाडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्लेकेल- अझहर अली (136) च्या शतकी खेळीनंतरही पाकिस्तान संघ श्रीलंकेविरुद्ध तिसºया कसोटीच्या चौथ्या दिवशी अडचणीत सापडला. पाकिस्तानने आपल्या दुसºया डावात 8 बाद 299 धावा काढल्या. मात्र, त्यांच्याकडे केवळ 2 विकेट शिल्लक आहेत. आता गुरुवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी श्रीलंकेने पाकला झटपट गुंडाळले तर त्यांना विजयासाठी मोठे लक्ष्य मिळणार नाही. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या विजयाची शक्यता वाढेल. श्रीलंकेला पहिल्या डावात 111 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली होती. अलीने कसोटीत चौथे शतक ठोकले. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहंमद हफिज (52) आणि मधल्या फळीचा फलंदाज असद शफिक (55) यांनी अर्धशतके ठोकली. या तिघांशिवाय पाकच्या इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी शफिक 55, तर अदनान अकमल शून्यावर खेळत होते. श्रीलंकेकडून डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने 4, तर दिलहारा फर्नांडोने 3 विकेट घेतल्या.
हफिज-अझहरची अर्धशतकी भागीदारी- पाकिस्तानने 1 बाद 27 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. हफिज आणि अली यांनी दुसºया विकेटसाठी 94 धावांची उपयुक्त भागीदारी केली. हफिज 52 धावा काढून 110 च्या स्कोअरवर बाद झाला. युनूस (19) आणि मिसबाह (5) यांना हेराथने लवकर बाद करून पाकिस्तानची स्थिती 4 बाद 176 अशी केली. अलीने यानंतर पाचव्या विकेटसाठी शफिकसोबत 100 धावा झोडल्या. फर्नांडो आणि हेराथने यांनी अवघ्या 23 धावांच्या अंतरात 4 विकेट घेऊन पाकिस्तानला अडचणीत आणले.
अझहरचे झुंजार शतक- पाकिस्तानचा युवा मधल्या फळीचा फलंदाज अझहर अलीने संघाला गरज असताना चिवट खेळ करून शतक ठोकले. अझहरने तब्बल 284 चेंडूंचा सामना करताना 13 चौकारांसह 136 धावा ठोकल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अझहरचा अडथळा श्रीलंकेच्या दिलहारा फर्नांडोने दूर केला. पाकच्या 276 धावा झाल्या असताना अझहर पाचव्या विकेटच्या रूपात बाद झाला. त्याने मो. हफिज आणि असद शफिकसोबत दोन मोठ्या भागीदाºया करून पाकचा डाव सावरला.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव 226. श्रीलंका पहिला डाव 337. पाकिस्तान दुसरा डाव 8 बाद 299.