आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंकेने कसोटी मालिका जिंकली; शफिक सामनावीर, संगकारा मालिकावीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्लेकल- येथील मैदानावर श्रीलंका व पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तिसरा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह श्रीलंकेने तीन वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली. श्रीलंकेने ही मालिका 1-0 ने खिशात घातली. शेवटची मालिका श्रीलंकेने 2009 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकली होती. मुरलीच्या निवृत्तीनंतर लंकेचा पहिला मालिका विजय आहे.श्रीलं
पाकने 8 बाद 380 धावांवर दुसरा डाव घोषित केला. त्यानंतर 270 धावांनी पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेने पाचव्या व शेवटच्या दिवशी 4 बाद 195 धावा काढून कसोटी अनिर्णित ठेवली. पहिल्या डावात अर्धशतक व दुसर्‍या डावात शतक ठोकणारा पाकचा असद शफीक सामनावीरचा मानकरी ठरला. मालिकेत सर्वाधिक 490 धावा काढणारा कुमार संगकारा मालिकावीर मानकरी ठरला. श्रीलंकेने पहिली कसोटी 209 धावांनी जिंकली होती. दुसरी कसोटी अनिर्णित राहीली होती. ऑकेने तब्बल तीन वर्षांनंतर कसोटी मालिका विजयाचा योग जुळवून आणला आहे. श्रीलंकेने 2009 मध्ये कसोटी विजयानंतर श्रीलंका संघाच्या आठ मालिका अनिर्णित राहील्या. पाकचा 2010 नंतरचा पहिल्यांदा मालिका गमावली आहे. जुलै 2010 मध्ये इंग्लंडने पाकला 3-1 ने धूळ चारली होती.