आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srilanka Vs South Africa Match News In Marathi, T 20 World Cup

टी-20विश्‍वचषक :श्रीलंकेची द. आफ्रिकेवर मात; न्यूझीलंडने इंग्लंडला हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - वर्ल्डकप टी-20 स्पर्धेत एम. परेराच्या (60) अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर 5 धावांनी विजय मिळवला. दुस-या सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा 9 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 7 बाद 165 धावा काढल्या. यात सलामीवीर एम. परेराने अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार आणि 3 षटकार खेचत 61 धावा ठोकल्या. मॅथ्यूजने 32 चेंडूंत 43 धावा उभारल्या.

कुमार संगकाराने 14 आणि चंदीमलने 12 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. आफ्रिकेच्या इम्रान ताहीरने 3 आणि डेल स्टेन व मोर्केलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात आफ्रिका 8 बाद 160 धावा करू शकला. यात कॉक 25, आमला 23 आणि डुमिनीने 39 धावा केल्या.