आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srilankan Cricketer Thilan Samarvira Declared Retirement In International Cricket

श्रीलंकन क्रिकेटपटू थिलन समरवीराची निवृत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- श्रीलंकेचा मधल्या फळीचा फलंदाज थिलन समरवीराने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. गॅले येथे होणार्‍या बांगलादेशविरुद्धच्या श्रीलंका संघातून वगळल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.

श्रीलंकन क्रिकेट मंडळाला पत्र लिहून त्याने ही माहिती कळवली. संघाबाहेर केल्यानंतर मला धक्काच बसला, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. समरवीराने लंकेकडून 81 कसोटीत खेळताना 48.76 च्या सरासरीने 14 शतकांसह 5462 धावा काढल्या. त्याने 61 वनडे सामन्यातही सहभाग घेतला होता.